|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बिअरबार-परमिट रुमला ना हरकत परवाना नाही

बिअरबार-परमिट रुमला ना हरकत परवाना नाही 

 प्रतिनिधी/ खंडाळा

खंडाळा नगरपंचायत क्षेत्रात बिअरबार व परमिट रूम सुरु करण्यासंदर्भात ना हरकत दाखला मागणीसाठी आलेले सुमारे सव्वीस अर्ज एकमताने फेटाळले, तर पुढील पाच वर्षात कोणत्याही बिअरबार, परमिट रुमला  ना हरकत परवाना देण्यात येणार नाही. असा ठराव आज झालेल्या विशेष सभेत करण्यात आला.

खंडाळा नगरपंचायत हद्दीत बिअरबार व परमिट रुम सुरू करण्यासाठी अनेकांनी नगरपंचायतीकडे ना हरकत दाखल्यांच्या मागणीसाठी अर्ज केले होते. या विषयासह अन्य विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 13 रोजी विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र, काही सत्ताधारी नगरसेवक गैरहजर राहिल्याने ही विशेष सभा तहकूब करण्यात आली होती. आज या विषयांवर सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष शरद दोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते ना हरकत दाखले न देण्याचा ठराव मंजूर केला.

यावेळी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, ऍड.शामराव गाढवे, पंकज गायकवाड, लताताई नरुटे, सुप्रीया गुरव, उज्वला गाढवे, सुप्रीया वळकुंदे, शोभा गाढवे, अनिरूध्द गाढवे, प्रल्हाद खंडागळे, दत्तात्रय गाढवे, साजीद मुल्ला, युवराज गाढवे, स्वप्नील खंडागळे, कल्पना गाढवे, जयश्री जाधव, उज्वला संकपाळ, मुख्याधिकारी निखिल जाधव उपस्थित होते.

Related posts: