|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News » बॉलिवूडचा स्मार्ट हीरो विनोद खन्ना पडद्याआड

बॉलिवूडचा स्मार्ट हीरो विनोद खन्ना पडद्याआड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.
विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकी भूमिका करत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचा ‘हिरो’चा प्रवास सुरुच झाला. २०१५ मध्ये आलेला ‘दिलवाले’ हा त्यांनी काम केलेला अखेरचा सिनेमा.१९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे गुरुजासपुर, पंजाबचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.

 

Related posts: