|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » …अन्यथा तुरुंगात पाठवू ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

…अन्यथा तुरुंगात पाठवू ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सहारा सेबीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना 19 जूनपर्यंत 1 हजार 500 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जर रॉय यांनी ही रक्कम जमा केली नाही तर त्यांना तुरुंगात पाठवू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

मागील आठवडय़ात न्यायालयाने सहाराच्या मालकीच्या ऍम्बी व्हॅलीच्या विक्रीचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची मालमत्ता विकण्यासाठी ऑफिशिअल लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. न्यायालयाने रॉय यांना 28 एप्रिल किंवा त्यापूर्वी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचेही सांगितले. तसेच 19 जूनपर्यंत सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्यासाठी ड्राफ्ट करावा. जर 19 जूनपर्यंत याबाबतचा चेक मिळाला नाही तर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, अशा इशारा दिला.

Related posts: