|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » आता नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पुर्नपरीक्षा

आता नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पुर्नपरीक्षा 

ऑनलाईन टीम / मुंबई :
दहावी प्रमाणे आता नववीत नापास होणाऱ्या विद्याथ्र्यांचीही जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एप्रिलमध्ये नववीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी नापास होतील त्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळांतील अनेक बदल केले आहेत. त्यामध्ये नववीच्या नापास विद्याथ्र्यांचा विचार करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीपासून दहावीच्या नापास विद्याथ्र्यांची फेरपरीक्षा घेऊन त्या विद्याथ्र्यांना अकरावीला प्रवेश देण्यात येते. त्याचधर्तीवर नववी नापासांनादेखील फेरपरीक्षेची संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा शाळास्तरावर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच शाळा सुरू होण्यापूर्वी घेण्यात येणार आहेत.

Related posts: