|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार

सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने अतिशय स्तुतय पाऊल उचलले आहे. सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर अचलणार आहे. छत्तीसगडमधील सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 74 बटालियनच्या 25 सीआरपीफ जवान शहीत झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.

“गोतम गंभीर फाऊंडेशन सर्व शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उलचणार आहे, असे सांगत गंभीरचे मीडिया मॅनेचरने या वृत्तला दुजोरो दिला आहे. केंद्रीफ शहरविकास आणि गृहनिर्मा मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गौतम गंभीरच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. ‘शहीद जवानांच्याह मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून गौतम गंभीरने नवा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रेरणादायी , असे ट्विट नायडू यांनी केले आहे.