|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » जिल्हा बँकांचे शिखर बँकेमध्ये विलीनीकरण करा : मुख्यमंत्री

जिल्हा बँकांचे शिखर बँकेमध्ये विलीनीकरण करा : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे शिखर बँकेमध्ये विलीनीकरण करा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच शेतकऱयांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असताना सहकार विभागाला त्यांनी सूचनाही दिल्या.

खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील 31 बँकांपैकी 11 बँका तोटय़ात असून त्यापैकी बीड, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, जालना, परभणी आणि बुलडाणा बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. जिल्हा बँका आर्थिक डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करा, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

Related posts: