‘बाहुबली 2’ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

आनलाईन टीम/ मुंबई
दिग्दर्शक एसएस राजमौली आणि प्रभास यांच्या बाहुप्रतिक्षित ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून नवीन रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणाऱया चित्रपटाची लोकांना प्रचंड अत्सुकता आहे.
भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या ‘बाहुबली 2’ने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. बॉक्स ऑफिस रिपोर्ट आणि मिळालेल्या माहितीनुसार बहुबलीने अत्यंत सहजपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींची तुफानी कमाई करणारा बाहुबली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे.
Related posts:
Posted in: मनोरंजन