|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जैन धर्माची तत्त्वे जगाला तारणारी : संयम सागर महाराज

जैन धर्माची तत्त्वे जगाला तारणारी : संयम सागर महाराज 

वार्ताहर/ कुंभोज

 जैन धर्माच्या आचार-विचारांची आज देशाला गरज असून त्याची तत्वे जगाला तारणारी असून सर्वांना आपल्यात सामावून घेणारी आहेत, असे प्रतिपादन परमपुज्य संयम सागर महाराज यांनी काढले.

 हिगंणगाव (ता. हातकणगले) येथे इंद्रध्वज आराधना महोत्सवाच्या दुसऱया दिवशी मंगल प्रवचनात ते बोलत होते. सकाळी ‘सत्य अंहिसा परमोधर्म की जय’ ‘जैन धर्म की जय’च्या जयघोषात मंगलवाद्याच्या गजरात सौ. धर्मइंद्र इंद्रायणी कल्लाप्पा गडकरी, सुवर्णा गडकरी, ईशान्य इंद्र इंद्रायणी, सूर्यकांत पाटील, निर्मल पाटील यांचे हत्तीवरुन मंडपामध्ये नित्य विधिने आगमन झाले त्यानंतर हत्तीवरुन मंगल कुंभानयनचा मान रवींद्र बापुसो देसाई, रचना रवींद्र देसाई यांना मिळाला. हत्तीवरुन त्यांच्या हस्ते मंगलकुंभासह गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढून मंडपात आणण्यात आले. सर्व यजमान पदधारक यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक घालण्यात येवून महाशांती मंत्र पठण करण्यात आले. मंदिरामधील भंगवंताचा मुर्तिला पद यजमानधारक यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले. दुपारी प. पू. त्यागींकडून धर्मापदेश व सवालाचा कार्यक्रम झाला. सांयकाळी हत्तीवरुन मंगलवाद्याच्या गजरात धार्मिक जयघोषात  गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हा सवाल अनंतकुमार देसाई यांनी घेतला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प. पू. संयम सागर महाराज, धर्मसागर महाराज, अर्हदबलीजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. विधानचार्य पंडित प्रवीण उपाध्ये, सचिन उपाध्ये, शांतीनाथ उपाध्ये हे विधीवत पुजेचे विधी करत आहेत. इंद्रध्वज आराधनाचा दुसरा दिवस असून विधान पाहण्यासाठी श्रावक-श्राविकांची गर्दी झाली होती.