|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा : डॉ.अंजना जाधव

पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा : डॉ.अंजना जाधव 

पेठ वडगांव/प्रतिनिधी :

पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पर्यावरण रक्षण ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्ष संवर्धन आणि प्रदुषणमुक्त जीवन यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुर वत्सल सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अंजना जाधव यांनी केले.

            वसुंधरा दिनानिमित्त सुर वत्सल सामाजिक संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सदस्य सत्वशील जाधव, नाबार्डच्या माजी व्यवस्थापिका देवयानी वडगांवकर, रेखा आडमुठे, मंगल पारखे, माधुरी गौड, वैशाली पाटील, छाया कांबळे, सीमा वादवणे आदी प्रमुख उपस्थित होते.

            यावेळी डॉ.जाधव यांनी यांनी बदलत्या वातावरणाचा व वाढत्या प्रदुषणाचा स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली. वातावरणाशी सुसंगत बदल आपल्या जीवनशैलीत घडवून आणल्यास व आरोग्याच्या तक्रारीची दखल वेळोवेळी घेतल्यास आर्युमान उंचावण्यास मदत होते. कुटूंबाचे व पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य राखले जाते.

            यावेळी देवयानी वडगांवकर यांनी घरच्या घरी कचर्यापासून खत बनवून सेंद्रिय भाजीपाला मिळविणे, वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घेणे, स्वच्छता, ie@me®ee Hाखमाणात वापर याबाबत माहिती महिलांना दिली. यावेळी स्वयंरोजगाराच्या विविध संधीची माहिती महिलांना त्यांनी दिली. यावेळी संस्थेच्या सदस्या, महिला, युवती उपस्थित होत्या.