|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » मे महिन्यात येणार चार कार

मे महिन्यात येणार चार कार 

कार कंपन्यांचे एसयुव्ही प्रकारावर विशेष लक्ष

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017 वर्षाच्या मार्च तिमाहीत प्रवासी कार क्षेत्रासाठी चांगली विक्री झाली. अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक कार उतरवण्याची रणनीति तयार केली आहे. कंपन्यांच्या या रणनीतिमुळे मे 2017 मध्ये नवीन कार मॉडेल्स कंपन्यांकडून बाजारात उतरवण्यात येणार आहेत. मे महिन्यात दाखल करण्यात येणाऱया कारमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स एसयूव्ही चा कब्जा राहणार आहे. चालू महिन्यात एसयूव्ही दाखल करणाऱया कंपन्यांमध्ये टोयोटा, फॉक्सवॅगन, स्कोडा आणि इजुसू यांचा समावेश आहे.

फॉक्सवॅगन टिगुआन

पोलो जीटीआय आणि एमियो या कार दाखल केल्यानंतर फॉक्सवॅगन इंडिया भारतीय बाजारावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. बाजारावर मजबूत पकड करण्यासाठी कंपनीने नवीन उत्पादन सादर करण्यास प्रारंभ केला आहे. फॉक्सवॅगन टिगुआन ही कार या महिन्यात दाखल करण्यात येईल अशी घोषणा कंपनीकडून अगोदरच करण्यात आली आहे. कंपनीने या कारसाठी नोंदणी सुरू केली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये आगाऊ स्वरुपात जमा करावे लागतील. या कारची किंमत अद्याप घोषित करण्यात आली नसली तरी ती 25 लाख ते 30 लाख रुपयांदरम्यान असेल असे सांगण्यात येते. टोयोटा फॉर्च्यून आणि फोर्ड एन्डेव्हर या कारशी टिगुआन स्पर्धा करेल.

स्कोडा कारोक

स्कोडा कंपनीची ही कार येटी कारची जागा घेणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कारला मे महिन्यात दाखल करण्यात येणार आहे. कंपनीने हे नाव कार एरो या अलास्कामधील भाषेवरून घेतले आहे. या कारची किंमत 25 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. स्कोडा कारोक कार फॉक्सवॅगन समुहाच्या एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. पेट्रोल प्रकारात 1.0 लिटर टीएसआय टर्बोचार्ज थ्री सिलिंडर युनिटमध्ये सादर करण्यात येणार आहे. 113 बीएचपी पॉवर आणि 175 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये आहे.

            टोयोटा इनोव्हा क्रिस्टा टूरिंग स्पोर्ट्स

 

Toyota-Innova-Crysta-

मे महिन्यात स्पेशल एडिशन इनोव्हा क्रिस्टा टूरिंग स्पोर्ट्स मॉडेल सादर करण्याची घोषणा टोयोटा इंडियाने केली आहे. दिल्लीमध्ये 3 मे आणि मुंबईत 4 मे रोजी ही कार दाखल करण्यात येईल. कंपनीने आपल्या अगोदरच्या पद्धतीप्रमाणेच नवीन टोयोटा क्रिस्टा टूरिंग स्पोर्ट्स मध्ये केवळ लुकमध्ये बदल केला आहे. याचप्रमाणे नवीन वाईन रेड बॉडी कलरबरोबर ब्लॅक ट्रिटमेन्ट दिली आहे. कारच्या समोरील बाजूस ब्लॅक क्रोमबरोबर लार्ज हेक्सागन ग्रिल दिली आहे.

इसुजू एसयुव्ही एमयु-एक्स

इसुजू कार निर्माता कंपनी एसयुव्ही प्रकारातील एमयु-एक्स भारतात 11 मे रोजी दाखल करणार आहे. कंपनीने थायलंडमध्ये कारची विक्री करण्यास प्रारंभ केला आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लाओस, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्समध्ये विक्री करण्यात येत आहे. कंपनीने भारतातील आपल्या प्रकल्पात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.