|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » वनडे मानांकनात भारत तिसऱया स्थानी

वनडे मानांकनात भारत तिसऱया स्थानी 

वृत्तसंस्था/ दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या ताज्या वनडे मानांकन यादीत भारताचे स्थान वधारले आहे. या यादीत आता भारत तिसऱया स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱया स्थानावर असून ते केवळ एका गुणाने भारतापेक्षा पुढे आहेत.

जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपद पुन्हा आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱया स्थानासाठी चुरस राहील.

आयसीसीच्या ताज्या वनडे मानांकनात दक्षिण आफ्रिका 123 गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह दुसऱया, भारत 117 गुणांसह तिसऱया, न्यूझीलंड 115 गुणांसह चौथ्या, इंग्लंड 109 गुणांसह पाचव्या, लंका 93 गुणांसह सहाव्या, बांगलादेश 91 गुणांसह सातव्या, पाक 88 गुणांसह आठव्या, विंडीज 79 गुणांसह नवव्या, अफगाण 52 गुणांसह दहाव्या, झिंबाब्वे 46 गुणांसह अकराव्या आणि आयर्लंड 43 गुणांसह बाराव्या स्थानावर आहे.