|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा जैव विविधता मंडळातर्फे 22 मे रोजी जैवविविधता दिवस

गोवा जैव विविधता मंडळातर्फे 22 मे रोजी जैवविविधता दिवस 

प्रतिनिधी/ पणजी

 ‘गोवा राज्य बायोडायव्हर्सिटी बोर्ड’, ‘नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथोरिटी इंडिया’ व गोवा छाया पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मे रोजी आंतराष्ट्रीय जैव विविधता दिवस साजरा केला जाणार आहे. कार्यकमाचे उद्घाटन 22 मे रोजी सकाळी 10 वा. दिनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री अनिल माधव दवे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्यपाल मृदूला सिन्हा व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खास उपस्थिती लाभणार आहे, असे गोवा राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 या कार्यकमानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, पथनाटय़ स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व फोटो स्पर्धा आयोजित केली आहे. यावर्षी खास ‘जैवविविधता व शाश्वत पर्यटक’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे.

 पथनाटय़ स्पर्धेमध्ये स्पर्धकांची  वयोमर्यादा 14 वर्षा पेक्षा जास्त असावी. यात  दोन ते जास्तीत जास्त 15 सदस्य सहभागी होऊ शकतात. यात प्रथम पारितोषिक 10 हजार द्वितीय 7.5 हजार व तृतीय 5 हजार अशी ठेवण्यात आली आहे.  तसेच वकृत्व स्पर्धा ही 14 ते 17 व 18 ते वर अशा दोन विभागामध्ये घेतली जाणार आहे. यात पहिल्या गटात प्रथम पारितोषिक 3 हजार, द्वितीय 2 हजार व तृतीय 1 हजार तर दुसऱया गटात प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार असे ठेवण्यात आले आहे.  14 मे रोजी ही स्पर्धा घेतली जाणार असून 10 मे अगोदर इच्छुकांनी बायोडायव्हर्सिटी मंडळाकडे संपर्क साधावा. पोस्टल स्पर्धा ही 14 ते 17 व 18 ते वर अशा दोन विभागामध्ये घेतली जाणार आहे. यात पहिल्या गटात प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार तर दुसऱया गटात प्रथम पारितोषिक 7 हजार, द्वितीय 5 हजार व तृतीय 3 हजार असे ठेवण्यात आले आहे. 10 मे अगोदर स्पर्धकांनी आपले पोस्टर बायोडाव्हर्सिटी मंडळाकडे सुपुर्द करावे.

फोटोग्राफी स्पर्धा

 फोटोग्राफी स्पर्धा ही सगळय़ांसाठी खुली असून मोफत प्रवेश आहे. ‘जैव विविधता व शाश्वत पर्यटक या विषयावर फोटो घेतले जाणार आहेत. स्पर्धेतील फोटो हे गोव्याबाहेरील नसावेत. एक स्पर्धक आपले चार निवडक फोटो पाठवू शकतो. यात कुठलीही एडिटींग व मिश्रण न करता आपल्या खऱया फोटोसहीत वेळ जागा याची माहिती फोटो सहित द्यावी लागेल. यात  प्रथम पारितोषिक 20 हजार, द्वितीय 15 हजार व तृतीय 10 हजार तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ 3 हजार व चषक प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी 13 मे अगोदर गोमंतक टाईम्स पणजी सांतईनेज (आतिश नाईक-96571550470 ) यांच्याकडे संपर्क साधावा. तर दक्षिण गोव्यात नवहिंद टाईम्स मडगाव (गणदीप शेल्डेकर 9422442466) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन छाया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश शेटकर यांनी केले आहे.