|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुतात्मा चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाची ऐशीतैशी

हुतात्मा चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाची ऐशीतैशी 

प्रतिनिधी / बेळगाव

बाजारपेठेच्या मध्यभागात असलेल्या हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली. चौकातील विहिरीवर बारा घडघडे बसविण्यात आले आहेत. मात्र, येथील विहिरीच्या भिंतीवर भित्तीपत्रके चिकटविण्यात आली आहेत. यामुळे लाखोचा निधी खर्चून सुशोभिकरण करण्यात आलेल्या विहिरीची दुरवस्था झाली आहे.

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेच्यावतीने कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण हे सौंदर्य महापालिका यंत्रणा आणि नागरिकांकडून जपले जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. हुतात्मा स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. याकरिता चार लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला. याअंतर्गत हुतात्मा स्मारक परिसरातील फरशा बदलण्यात आल्या. स्मारकाची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच बारा घडघडा विहिरीचे सुशोभिकरण करण्यात आले असून याअंतर्गत बारा घडघडे बसवून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येथील ट्रान्स्फॉर्मरचेही स्थलांतर करण्यात आले. मात्र  पोलीस चौकीमुळे स्मारक झाकोळले जात आहे. अशातच जाहिरात फलक लावण्यात येत असल्याने पोलीस चौकी आतील बाजूला स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.

विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र लाखोचा निधी खर्चूनही परिसराची दुरवस्था झाली आहे. विहिरीच्या भिंतीवर विविध जाहिरातींची भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. तसेच विहिरीभोवती असलेल्या कट्टय़ावर वाहने पार्क करण्यात येत असल्याने परिसराची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Related posts: