|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » केटरिंग विभागात घोटाळा झाला नाही : मध्य रेल्वे

केटरिंग विभागात घोटाळा झाला नाही : मध्य रेल्वे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मध्य रेल्वेच्या केटरिंग विभागात घोटाळा झालाच नाही, असा दावा मध्य रेल्वेचे केटरिंग विभागाचे मुख्य व्यवसायिक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी केला. मध्य रेल्वेतील केटरिंग विभागात कथित घोटाळा समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हे उत्तर देण्यात आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये रेल्वेच्या केटरिंग विभागात घोटाळासदृश माहिती समोर आली. मध्य रेल्वेचे केटरिंग विभाग तोटय़ात चालत असल्याचे समजल्यानंतर बोस यांनी ही माहिती मागवली होती. त्यावरुन केटरिंग विभागात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले. दरम्यान, माहिती अधिकारातून मिळालेली ही माहिती चुकीची असल्याचे सांगण्यात येत आहे.