|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » किम जोंग यांना भेटल्यास सन्मानित वाटेल

किम जोंग यांना भेटल्यास सन्मानित वाटेल 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

वॉशिंग्टन

: उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपण किम यांना भेटून स्वतःला सन्मानित समजू असे म्हटले आहे. किम यांना भेटणे माझ्यासाठी योग्य असेल तर मी ते करेन असेही त्यांनी नमूद केले. उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.

कोरियन उपखंडातील तणावाचे कारण उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम आहे.  2017 मध्येच उत्तर कोरियाने 3 क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. याचप्रकारे उत्तर कोरियाने 20006 पासून आतापर्यंत 6 आण्विक चाचण्या घेतल्या आहेत. मार्च 2017 मध्ये उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानच्या सागरी क्षेत्रात कोसळले होते. यामुळे उत्तर कोरिया आणि जपानदरम्यान तणावात वाढ झाली होती.

उत्तर कोरियाच्या आण्विक हल्ल्याच्या धमकीनंतर अमेरिकेने त्याच्या दिशेने सर्वात मोठी आण्विक पाणबुडी, युद्धनौकांचा ताफा तैनात केला आहे. उत्तर कोरियावर अमेरिकेचा हा सर्वात मोठा लष्करी घेराव आहे. यानंतरही उत्तर कोरियाने आपण नव्या आण्विक चाचणीसाठी तयार असल्याचे घोषित केले आहे.