|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजे ही तुमची शेवटचीच खासदारकी

उदयनराजे ही तुमची शेवटचीच खासदारकी 

प्रतिनिधी/ सातारा

गंभीर गुह्यातील फरारी आरोपी असणारे खासदार उदयनराजे भोसले यांना केसाने गळा कापायची जुनी सवयच आहे. पाठीत खंजीर खुपसून राजकारण करीत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी पोलिसात हजर व्हावे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मीच पूर्णविराम देणार असून सध्याची टर्म ही त्यांची शेवटचीच खासदारकी आहे.

बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द वाचवावी व भुंकणारी तुमची कुत्री आवरावीत, असे स्पष्ट प्रतिपादन असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी केले आहे.

खासदार उदयनराजेच्या अटकेची मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या समर्थकांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांना उत्तर देताना संदीप मोझर यांनी ही टीका केली आहे.

उदयनराजेंच्या बगलबच्च्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. माझ्यावर टीका करण्याची त्यांची पात्रताच नाही. 1997 च्या बॅचचा कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनियरींग कॉलेजचा मी टॉपर आहे. तेथील बोर्डवर माझे नाव दिसेल. उदयनराजे फरार असल्याने त्यांना ती यादी वाचता येणार नाही. मात्र, त्यांच्या बगलबच्च्यांनी माझे शैक्षणिक गुणवत्तेचे बोर्ड कॉलेजमध्ये जावून कोणाकडून तरी वाचून घ्यावेत. नान्या, बन्यासारख्या ओवाळून टाकलेल्यांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही. अशी टिका करुन मोझर यांनी प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी कारागृहात असूनही मला 18,600 मते मिळाली होती. माझ्या वाढत्या राजकीय वर्चस्वाची भीती वाटूनच खोटय़ा गुह्यात अडकवून मला 22 महिने गजाआड ठेवण्याचा डाव उदयनराजेंनी खेळला. माझे काही घरभेदी आणि गद्दाराच्या कुबडय़ांचा आधार घेवून मला तुरंगात डांबण्याची खेळी त्यांनी खेळली. मात्र, यापुढे हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. सन 2019 च्या निवडणुकीत जनताच उदयनराजेंना पराभूत करेल.

अस्मान दाखवण्यासाठी हा मावळा सज्ज

खासदारसाहेबांनी हिम्मत असेल तर आगामी निवडणुकीत त्यांनी माझ्याशी लढत द्यावी. त्यांना अस्मान दाखवण्यासाठी हा मावळा सज्ज आहे. पाठीत खंजीर खुपसून राजकारण करण्यापेक्षा दम असेल तर उदयनराजेंनी 2019 च्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. लोकशाहीचा व संविधानाचा अपमान केल्याबद्दल सातारा जिह्यातील सूज्ञ जनताच तुम्हांस तुमची खरी जागा दाखवेल, असे संदीप मोझर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

Related posts: