|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » प्रेक्षकांना हसवण्यासाठी डॉ. गुलाटींची ‘कॉमेडी फॅमिली’ सज्ज

प्रेक्षकांना हसवण्यासाठी डॉ. गुलाटींची ‘कॉमेडी फॅमिली’ सज्ज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

‘द कपिल शर्मा शो’ सध्या बंद होण्याच्या मार्गावर असतानाच कॉमेडियन सुनील ग्रोवरने खळखळून हसवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सुनील ग्रोवर, अली असगर , सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर , संकेत भोसले हे ओळखीचे विनोदी चेहरे पुन्हा एकदा त्यांच्या धमाल विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची दादा मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कपिलच्या शोमधून काढता पाय घेतल्यानंतर सुनील ग्रोवर ‘द कॉमेडी फॅमिली’ या कार्यक्रमातून विनोदी खेळी करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे कपिल शर्माच्या टीममधील बरेच चेहरे यात सुनीलची साथ देणार आहेत.

‘द कॉमेडी फॅमिली’ कोणत्या वाहिनीवर आणि कधीपासून प्रदर्शित होणार हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करत आहे. पण, जास्त उतावीळ होण्याचे काहीच कारण नाहीये. सुनील त्याच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय खरा. पण हा, एक लाइव्ह कार्यक्रम असेल. या कार्यक्रमातूनच अहमदाबादमध्ये मे महिन्यात 27 तारखेला ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि त्यांचे अंतरंगी कुटुंब विनोदी फटपेबाजी करणार आहे.

 

Related posts: