|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » इमानचे वजन 500 किलोवरून 176वर

इमानचे वजन 500 किलोवरून 176वर 

ऑनलाईन टीम / मुंबई 

जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख घेऊन भारतात उपचारासाठी आलेली इमान अहमद आता अबुधाबीला जाणार आहे. 81दिवसानंतर इमान भारतातून जाण्यास सज्ज झाली आहे. सैफी रूग्णालयात उपचार करण्यात आलेली इमान गुरूवारी सकाळी 10.30 वाजता अबूधाबीसाठी निघणार आहे. तिथे गेल्यानंतर तिच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

इजिप्तची इमान उपचारांसाठी कार्गो विमानाने भारतात दाखल झाली होती. 500 किलो वजन असलेल्या इमानचे उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर आताचे वजन 173 किलो एवढे आहे. त्यामुळे आता ती सामान्य प्रवाशाप्रमाणे भविष्यातील फिजिओथेरीपीच्या उपचारांसाठी विमानच्या बिझनेस क्लासहून अबुधाबीला लवकरच रवाना होणार आहे.

 

Related posts: