|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सूरतच्या उद्योजकाकडून मुलींकरता 200 कोटीचा बाँड

सूरतच्या उद्योजकाकडून मुलींकरता 200 कोटीचा बाँड 

10000 मुलींना लाभ : पंतप्रधानांमुळे उद्योजक प्रेरित

वृत्तसंस्था /  सूरत

गुजरातच्या एका उद्योजकाने पाटीदार समुदायाच्या 10 हजार मुलींसाठी 200 कोटी रुपयांचे बाँड वितरित केले आहेत. सुरतमध्ये आयोजित समस्त पाटीदार समाज कार्यक्रमात लवजी डी. दैल्या उर्फ बादशाह यांनी याबाबत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेमुळे आपल्याला यासाठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

 आमच्या समुदायात स्त्राrभ्रूणाची हत्या केली जाते. डॉक्टरांशी चर्चा केल्यावर लोक या अवैध गर्भपाताला रोखण्यासाठी जागरुकता फैलावू इच्छित असल्याचे आढळले. याकरता कुटुंबातील दुसऱया मुलीचे शिक्षण आणि विवाहाच्या खर्चासाठी हा बाँड देण्याचा निर्णय घेतल्याचे 200 कोटीचा बाँड देणारे बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक लवजी यांनी सांगितले. या बाँडनुसार मुलीला तिच्या 20 व्या जन्मदिनी 2 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.

2015-16 मध्ये जन्मलेल्या मुलींसोबतच कुटुंबातील दुसऱया मुलींना देखील ‘बादशाह सुकन्या बाँड़’ योजनेंतर्गत ही रक्कम देण्यात आली. 10 हजार मुलींना 200 कोटीच्या हिशेबाने प्रत्येकीला 2 लाख रुपये मिळणार आहेत. यावेळी पूर्ण रकमेचे वितरण पाटीदार समाजाच्या पदाधिकाऱयांद्वारे करण्यात आले.