|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » युवीच्या ‘माणुसकीचे’ चाहत्याकडून कौतुक

युवीच्या ‘माणुसकीचे’ चाहत्याकडून कौतुक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अथक प्रयत्नांच्या जोरावर संकटावर मात करण्याची वृत्ती ठेवणाऱया युवराज सिंगने नुकतेच आयपीएल सामन्यादरम्यान त्याच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध सामन्यात युवीने कोणताही कमीपण न बाळगता प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ऋषभ पंत याच्या बुटाची लेस बांधण्यात मदत केली. हैदराबादच्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋषभ तिसऱया क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दरम्यान, ऋषभच्या बुटाची लेस सुटल्याने त्याला धावताना अडचण निर्माण झाली. पायाला पॅड बांधलेले असल्यामुळे लेस बांधणे शक्य नसल्याने ऋषभने पॅव्हेलियनमध्ये आपल्या सहकारी खेळाडूंना मदतीचे आव्हान केले. पण, दिल्लीचा खेळाडू मैदानात येण्याच्या आत युवीने पुढाकार घेत ऋषभच्या बुटाची लेस बांधून दिली. युवीच्या या माणुसकीची प्रेम फोटोग्राफरने कॅमेरात कैद केली. सोशल मीडियावर युवीचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.