|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अरुण डोंगरे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी

अरुण डोंगरे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी 

सोलापुर /वार्ताहर 

 टेंभुर्णी ग्रामसचिवालयातील तळमजल्यावरील जागा ही संगनमताने जिल्हा परिषदेचे तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी रणजित शिंदे यांना दिली. याबाबत जिल्हाधिकाऱयां आक्षेप असताना डोंगरे यांनी अधिकार नसताना हि जागा चुकिच्या पदध्तीने दिली. या बाबात दाद मागण्यासाठी 11 मे ला पंतप्रधान कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे बशीर जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

   ग्रामपंचायत टेंभुर्णी यांनी ग्रामसचिवालयातील तळमजल्यावरील 2500 चौ.फु. जागा बेकायदेशीरीत्या माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या खाजगी संस्था विठठ्ल सहकारी भांटार यांना 29 वर्षे कराराने दिली. हा करार करताना डोंगरे यांनी पुर्वपरवानगी घेतली नव्हती. बसस्थानकाची मोकळी जागा टेंभुर्णी ग्रामसचिवालय बांधकामासाठी जिल्हाधिकाऱयांनी दिली. या जागेवर मागासवर्गीयांवर देण्याचे अटी घातले होते. तरिही डोंगरे यांनी आपली चुकीची कार्यवाही केली.

   याबाबत वेळोवेळी स्तरातुन लेखी कळविले. जि.प. आणि जिल्हाधिकाऱयांना कळविले. याची दाद मागितली पण कार्यवाही काही झाली नाहि. त्यामुळे आता थेट पंतप्रधान कार्यालयाबाहेर वा जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचे बशीर जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  गेल्या वर्षभरापासुन अनेकवेळा पाठपुरावा केला पण कोणीही कारवाईला धजत नाही. जिल्हाधिकाऱयांनी नियम व अटी घालुन दिल्या असताना तत्कालिन मुख्यकार्यकारी अधिकारी असुन डोंगरे यांनी बेकायदा, नियमात व कायदय़ात न बसणारे कृत्य केले. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन बडतर्फची कारवाई करावी अशी मागणी बशीर जहागीरदार यांनी केली आहे. राज्य सरकार यावर दखल घेत नसल्याने दिल्लीमधे आंदोलन करत असल्याचे जहागीरदार यांनी सांगितले.

Related posts: