|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा अर्बन बँक निवडणुकीत डॉ. कामत पॅनेल

गोवा अर्बन बँक निवडणुकीत डॉ. कामत पॅनेल 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा अर्बन को. ऑ. बँकेच्या निवडणुकीत उतरलेल्या डॉ. गोविंद कामत पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले. यावेळी उद्योजक फ्रांसिस मिनेझिस, एस.एस. दवळवी, जितेंद्र मेहता, डॉ. गोविंद कामत व अन्य उमेदवार उपस्थित होते.

निवडणूक 7 मे रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्व अकराही तालुक्यात मतदान केंद्रे असतील. प्रत्येक मतदाराला आठ वाजता मत देता येणार आहे. मात्र मतदानासाठी येताना सरकारमान्य ओळखपत्र आणावे लागेल असे यावेळी सांगण्यात आले. गोवा अर्बन बँकेवर  चांगले पेनेल निवडून आणून बँकेच्या कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अनुभवी व तरुण उमेदवारांचे पॅनेल उभे करण्यात आले आहे. बँकेच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करून बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेले, चार्टर अकाऊटंट, वकील, व्यावसायिक अशा उमेदवारांचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या पॅनेलमधील शुभलक्ष्मी पै. रायकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता या पॅनेलमध्ये ऍड. चंद्रकांत चोडणकर संजीव देसाई, डॉ. गोविंद कामत, रवळनाथ लवंदे, नारायण प्रभूदेसाई, राजेश तळावलीकर, आशिष प्रभु वेर्लेकर व अवधुत चिमुलकर यांचा समावेश आहे. दोन जागावर उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाहीत. या बँकेचे एकूण 1 लाख 15 हजार भागधारक आहेत. यावेळी फ्रांसिस मिनेझिस, एस.एस. दळवी, डॉ. गोविंद कामत, ऍड. चंद्रकांत चोडणकर, आशिष प्रभू वेर्लेकर यांनी विचार व्यक्त केले. माजी अध्यक्ष विष्णू नाईक यांचे बँकेच्या वाटचालीत मोठे योगदान असल्याचेही प्रत्येक वक्त्याने सांगितले.