|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अपघातात सुळगा-येळ्ळूर येथील शेतकऱयाचा मृत्यू

अपघातात सुळगा-येळ्ळूर येथील शेतकऱयाचा मृत्यू 

प्रतिनिधी/ बेळगाव

भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने झालेल्या अपघातात शेतकऱयाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 9.45 वाजता सुळगा-येळ्ळूरजवळ हा अपघात घडला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

आनंद गंगाराम नावगेकर (वय 33, रा. सुळगा-येळ्ळूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. आनंदला गंभीर जखमी अवस्थेत खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले होते.

बेळगावहून देसूरकडे जाणाऱया भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने हा अपघात घडला. आनंद हा देसूरहून सुळगा-येळ्ळूरकडे येत होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने आनंदला सुरुवातीला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.