|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निवृत्त जवानाचे घर फोडून अडीच लाखाचा ऐवज लंपास

निवृत्त जवानाचे घर फोडून अडीच लाखाचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी / बेळगाव

समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर (हिंडलगा) येथील एका निवृत्त लष्करी जवानाचे घर फोडून चोरटय़ांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यामुळे चोरटय़ांचा उच्छाद सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर येथील रहिवासी काडाप्पा पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी हा प्रकार केला आहे. पाटील कुटुंब हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी घरात प्रवेश मिळवून सोन्या-चांदीचे दागिने आणि 25 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Related posts: