|Saturday, April 21, 2018
You are here: Home » Top News » एका सैनिकाच्या बदल्यात तीन शीर आणा : कॅप्टन अमरिंदर सिंग

एका सैनिकाच्या बदल्यात तीन शीर आणा : कॅप्टन अमरिंदर सिंग 

ऑनलाईन टीम / चंदिगड :

आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचे शीर कापले पाहिजे, अशा शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानी सैन्याच्या घृणास्पद कृत्याचा निषेध केला.

पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय लष्करातील जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, 1965 च्या युद्धावेळी भारतीय लष्कारात रुजू असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज असून, यावर लवकरात लवकरात विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमने पूंछ भागात 250 मीटर आत येऊन त्यांची हत्या केली. तसेच त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.

Related posts: