|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » अपंगांना राष्ट्रगीतादरम्यान उभे राहणे सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय

अपंगांना राष्ट्रगीतादरम्यान उभे राहणे सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सिनेमागृहात राष्ट्रगीत सुरु असताना व्यंगत्व आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींना राष्ट्रगीतासाठी उभे राहणे सक्तीचे नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे अपंगत्त्व असलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.

शारीरिक व्यंगत्त्व असणाऱया व्यक्तींना राष्ट्रगीतावेळी उभे राहणे सक्तीचे नसेल, याबाबतचे परिपत्रकच केंदीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहाप्रकारच्या व्यंगत्त्वाची यादी जाहीर केली. यामध्ये कर्णबधीर, अंपगत्त्व, मल्टीपल स्केलेरोसिस, बौद्धिक अपंगत्त्व, सेलेब्रल पाल्सी, पार्किन्सन्स रोग, मस्क्युलर, अंधत्त्व असलेल्या व्यक्तींना राष्ट्रगीतावेळी उभे न राहण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने अंतिम अहवाल तयार करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली.

Related posts: