|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » पतंजलिची उलाढाल 10 हजार कोटीवर

पतंजलिची उलाढाल 10 हजार कोटीवर 

नवी दिल्ली :

 योगगुरू रामदेवबाबांच्या पतंजलि आयुर्वेदच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक वृद्धी झाली आहे. 2016-17 या  आर्थिक वर्षात कंपनीला विक्रीतून 10651 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.  2015-16 हा आकडा 5000 कोटी इतका होता. कंपनीला सर्वाधिक उत्पन्न आपल्या देशी तूप आणि टूथपेस्ट या दोन उत्पादनातून मिळाल्याचे पंतजलिकडून सांगण्यात आले आहे.

गतवर्षी पतंजलिला देशी तूपाच्या विक्रीतून 1467 कोटी रुपये तर दंतकांतीद्वारे 940 कोटी रुपये प्राप्त झाल्याचे बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 2016-17  आर्थिक वर्षात वर्षात 10,651 कोटीच्या उलाढालीत या उत्पादनांचा सिंहाचा वाटा होता. तर केश तेल तसेच फेसवॉश गटात कंपनीची एकूण उलाढाल अनुक्रमे 825 कोटी आणि 228 कोटी इतकी आहे. आगामी काळात केस तेल सुगंधित तेलांच्या श्रेणीत आणखी भर टाकण्यात येणार असल्याचेही यावेळी बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले. 2017 या  आर्थिक वर्षात शॅम्पू गटात 15 टक्के इतका बाजारी हिस्सा पतंजलिने पटकावला आहे. तर फेसवॉश, डिशवॉश आणि मध या गटात पतंजलि उत्पादनांची बाजारातील एकूण हिस्सेदारी अनुक्रमे 15, 35, 50 टक्क्यांवर पोहचली आहे. आपल्या भविष्यकालीन योजनेविषयी सांगताना वर्तमानात पतंजलिची उत्पादन क्षमता 30-40 हजार कोटींची असून आगामी वर्षात ती 60 हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात पतंजलि सर्वात मोठे देशी ब्रँड बनणार असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.

निवासी पतंजलि सैनिक स्कूल

पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी शहीद जवानांच्या पाल्यांसाठी पतंजलि निवासी शाळा सुरू करणार असल्याची घोषणा केली. या निवासी शाळेत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

2018 पर्यंत 20 हजार कोटींचा

टप्पा गाठण्याचे लक्ष्य

?          पतंजलि आयुर्वेदने 2017-18 या वित्तवर्षात सध्याच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ करत 20,000 कोटीं रुपये उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

?          उत्पन्न दुप्पट करण्याकरिता आपल्या वर्तमान वितरक जाळय़ात वृद्धी करत ती 12,000 पर्यंत नेण्याची योजना कंपनीने आखली आहे.

?          अलीकडेच निवडक मसाल्यांची श्रेणीही पतंजलिकडून बाजारात दाखल करण्यात आली असून डेअरी क्षेत्रातही हात आजमावण्याची कंपनीची योजना आहे.

 

Related posts: