|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आगीचा गोळा होऊन रस्त्यावर कोसळले विमान

आगीचा गोळा होऊन रस्त्यावर कोसळले विमान 

अमेरिकेत अंगावर शहारे आणणारी घटना चित्रफितीत कैद

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एका वाहतूक सिग्नलजवळ प्रवासी विमान कोसळले आहे. विमान कोसळण्याची ही घटना सिग्नलवर थांबलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये  कैद झाली. येथे एक छोटे विमान रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या खांबावरून जात असताना तारांमध्ये अडकले आणि जमिनीवर येण्यापूर्वीच विमानाने आगीच्या गोळ्याचे रुप धारण केले.

कोमो न्यूजनुसार विमानाने नजीकच्या धावपट्टीवरूनच उड्डाण भरले होते. या दुर्घटनेनंतरही वैमानिक आणि प्रवासी सुखरुप असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. रस्त्यांवर अशी कोणतीही विमान दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अनेक वेळा अशा विमान दुर्घटना पाहावयास मिळाल्या
आहेत.

@2015 : तैवानची राजधानी तैपैईमध्ये 2015 साली एक विमान दुर्घटना घडली होती. फेब्रुवारीत झालेल्या या दुर्घटनेत धावपट्टीवरून उड्डाण भरणारे वाणिज्यिक विमान येथील एका उड्डाणपूलाला धडकल्यानंतर नदीत कोसळले होते. विमानात 58 जण सवार होते, ज्यातील 15 जणांना जीव गमवावा लागला होता.

@2012 : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 29 डिसेंबर 2012 रोजी एक विमान दुर्घटनाग्रस्त होऊन रस्त्यावर कोसळले होते. ही विमान दुर्घटना देखील एका कारच्या डॅशबोर्ड कॅममध्ये कैद झाली होती. विमान एका कारला जाऊन धडकल्याचे या चित्रफितीत दिसून आले होते. या दुर्घटनेत 5 जणांना जीव गमवावा लागला होता.

@2016 : 5 ऑगस्ट 2016 रोजी इटलीच्या बरगामो विमानतळावर एक मालवाहतुकीचे विमान धावपट्टी ओलांडून रस्त्यापर्यंत पोहोचले होते. यामुळे तेथील रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले रेलिंग तुटले आणि विमानाला नुकसान पोहोचले होते.

@2014 : अमेरिकच्या नॉर्थ पिनेलास येथे मॅक मुलेन-बूथ रस्त्यावर 22 मार्च 2014 रोजी एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. तर दोन युवतींना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Related posts: