|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नंदिहळ्ळी गावात कूपनलिका उघडीच

नंदिहळ्ळी गावात कूपनलिका उघडीच 

प्रतिनिधी / बेळगाव

अथणी तालुक्यातील झुंजरवाड येथे खुल्या कूपनलिकेमध्ये बालिका पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱयांनी खुल्या कूपनलिका बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही काही ठिकाणी कूपनलिका तशाच उघडय़ा आहेत.

नंदिहळ्ळी येथे सरकारी कट्टा म्हणून असलेल्या नाल्यालगत सरकारी कूपनलिका तशीच उघडय़ावर सोडण्यात आली आहे. नंदिहळ्ळी गावाला जाणाऱया मुख्य रस्त्याला लागूनच ही कूपनलिका आहे. पाणी न लागल्याने ती तशीच उघडय़ावर सोडण्यात आली आहे. त्या कूपनलिकेत लोखंडी क्रेसिंग पाईप आहेत. पण त्या पाईपचे तोंड उघडेच आहे. यामुळे धोका आहे.

जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी आदेश देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणी न लागलेल्या कूपनलिका तातडीने बुजवा, अशी सूचना देण्यात आली होती. पण बेळगाव तालुक्यातीलच नंदिहळ्ळी गावामध्ये अशा प्रकारे कूपनलिका उघडी असून देखील त्याकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Related posts: