|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मार्टसिटी योजनेच्या कामकाजास गती

स्मार्टसिटी योजनेच्या कामकाजास गती 

प्रतिनिधी/ बेळगाव

नगरविकास खात्याकडून दबाव टाकल्याने स्मार्टसिटी योजनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने कामकाजास गती आली आहे. लेअमर कन्सल्टंट कंपनीने तयार केलेल्या प्रस्तावांचे सादरीकरण कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रतिनिधींनी गुरुवारी स्मार्टसिटी कार्यालयात केले. क्हॅक्सिन डेपोमध्ये हेरिटेज पार्क, रस्त्यांचा आणि चौकांचा विकास तसेच किल्ल्याचे सुशोभिकरण अशी विविध विकासकामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिले.

स्मार्टसिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यासाठी गुरुवारी टिळकवाडी येथील स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर संज्योत बांदेकर, महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, खासदार, आमदार आणि महापालिकेचे अधिकारी आणि स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

  व्हॅक्सिन डेपो येथे हेरिटेज पार्क

स्मार्टसिटी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात व्हॅक्सिन डेपो येथे हेरिटेज पार्क
साकारण्यात येणार असून याकरिता 25 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावांतर्गत राबविण्यात येणाऱया कामाची माहिती देण्यात आली. शहरातील रस्त्यांचा आणि चौकाचाही विकास करण्याचा प्रस्ताव असून याकरिता 520 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. रस्त्यांची सद्यस्थिती आणि विकास झाल्यानंतर रस्त्यांचा दर्जा कसा असणार हे सचित्र प्रोजेक्टरद्वारा दाखविण्यात आले. रस्त्यांचे काम करताना जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, डेनेज वाहिन्या घालण्यासाठी गटारी करण्याचा प्रस्ताव असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पण रस्त्यांच्या विकासाची कामे टप्प्याटप्प्याने होणार असून यापैकी पहिल्यांदा चार रस्त्यांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 पहिल्या टप्प्यात विविध प्रकल्प

किल्ला परिसराची दुरवस्था झाली असल्याने विकास करण्याची तरतूद स्मार्टसिटी योजनेत करण्यात आली आहे. याकरिता पाच कोटीची तरतूद करण्यात आली असून किल्ल्याच्या अंतर्गत विकासासह सभोवती असलेल्या खंदकात बोटिंगची सुविधा करण्याचा प्रस्ताव आहे. असे विविध प्रकल्प पहिल्या टप्प्यात राबविण्याचा प्रस्ताव असल्याने याचे सादरीकरण करण्यात आले. सदर प्रस्ताव नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत तज्ञ व नागरिकांकडून सूचना घेऊन त्यानंतर राबविण्यात येणार असल्याची माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. यावेळी महापौर, आमदार, खासदारांनी विविध सूचना मांडून प्रस्ताव फक्त कागदावर न राहता तातडीने राबविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले.  

Related posts: