|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » अनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचाऱयांच्या पदोन्नतीसाठी सरकार सकारात्मक

अनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचाऱयांच्या पदोन्नतीसाठी सरकार सकारात्मक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शासकीय नोकऱयांमध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचाऱयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून, याबाबत विचार सुरु आहे.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने याबाबतचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपावला. समान संधी देण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी एससी आणि एसटी प्रवर्गाला बढतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक असल्याचे अहवालात सांगण्यात आले. तसेच सध्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये एससी आणि एसटीसाठी असलेला 15 टक्के आणि 7.5 टक्के कोटा पूर्ण भरलेला नाही. त्यामुळे रिक्त झालेला हा कोटा पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना याबाबतचे आदेश लवकरच देण्यात येतील

Related posts: