|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » जुन्या नोटांची मोजणी सुरूच

जुन्या नोटांची मोजणी सुरूच 

शक्तिकांत दास यांची माहिती : संपूर्ण मोजणी पूणे होण्यासाठी लागणार अजून कालावधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या किती जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्यात, याची मोजणी सुरू आहे. ही मोजणी पूर्ण करण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे आर्थिक सल्लागार शक्तिकांत दास यांनी सांगितले. जुन्या नोटांची पूर्ण माहिती गोळा करण्यासाठी रिझर्व्ह बँक काम करत आहे. मध्यवर्ती बँकेने जुन्या नोटांची मोजणी करण्यासाठी मशिनींचा वापर सुरू केला आहे.

जुन्या नोटांच्या मोजणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे आपल्याला वाटते. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा मोजणीची प्रक्रिया सामान्य स्थिती ठेवली आहे. नोटा मोजण्याच्या प्रक्रियेला काही मर्यादा आहेत. यामुळे याला विलंब होत आहे. अजून किती महिन्यांचा कालावधी लागेल याची माहिती अद्याप देता येणार नाही. मध्यवर्ती बँकेकडून ही नोटाबंदीची प्रक्रिया पूर्ण होण्याची आपण वाट पाहात आहोत असे त्यांनी म्हटले.

जीएसटीने जीडीपी आठ टक्क्यांवर

वस्तू सेवा कर लागू करण्यात आल्याने पुढील आर्थिक वर्षात जीडीपी 8 टक्क्यांवर पोहोचेल. गेल्या आर्थिक वर्षात हा दर 7.1 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात हा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 1 जूलैपासून संपूर्ण देशात जीएसटी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नवीन करप्रणालीचे परिणाम दिसण्यासाठी साधारण 9 महिने लागतील. 2018-19 या आर्थिक वर्षात जीडीपीवर कोणता परिणाम होतो हे समजण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले.