|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज

दोडामार्ग पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज 

दोडामार्ग

कसई-दोडामार्ग न. पं. च्या प्रभाग सातमधून निवडून आलेल्या उमेदवार संध्या प्रसादी अपात्र ठरल्याने या जागेसाठी 24 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 5 मे शेवटची तारीख होती. निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेतर्फे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

कसई-दोडामार्ग पं. स. प्रभाग 7 मधील शिवसेनच्या संध्या प्रसादी पूर्वी निवडून आल्या होत्या. मात्र, नगराध्यक्ष निवडीवेळी त्यांनी सेना-भाजपच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिले होते. त्यामुळे शिवसेना
गटप्रमुखाने याबाबत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. यावेळी झालेल्या सुनावणीत उपजिल्हाधिकारी रवींद्र रावळकर यांनी प्रसादी यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे फुलराणी गावकर यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे आदिती मणेरीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

5एनटी50

सावंतवाडी : जिमखाना मैदानावर महाराष्ट्र व्यापारी पेठेचे उद्घाटन करतांना जगन्नाथ हेगडे. बाजूला नगराध्यक्ष बबन साळगावकर, बाजूला अनंत भालेकर,  दीपा मंत्री.