|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी परिपत्रके उपलब्ध करण्यासाठी 22 मे पर्यंतची डेडलाईन

मराठी परिपत्रके उपलब्ध करण्यासाठी 22 मे पर्यंतची डेडलाईन 

तर भव्य मोर्चा काढण्याचे इशारा : म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

सीमाभागात 21 टक्क्मयांपेक्षाही अधिक मराठी भाषिक राहात आहेत. असे असताना मराठीत कागदपत्रे देण्यास कर्नाटक सरकार टाळाटाळ करत आहे. याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली असता त्यांनी मराठी भाषिकांना मराठीत परिपत्रके उपलब्ध करा, अशी सूचना करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कायद्यानुसार आम्हाला तातडीने कागदपत्रे उपलब्ध करा. 22 मे पर्यंत जर मराठी भाषेत कागदपत्रे मिळाली नाहीत तर भव्य मोर्चा काढू, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

कायद्यानुसार ज्या भागात 15 टक्क्मयांपेक्षा अधिक लोक एकत्र राहतात, त्यांना त्यांच्या भाषेत परिपत्रके उपलब्ध करणे बंधनकारक आहे. असे असताना कर्नाटक सरकार कायदा पायदळी तुडवत आहे. मराठी भाषिकांनी आपणाला मराठीत कागदपत्रे मिळावीत यासाठी अल्पसंख्याक आयोगाच्या आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी मराठीत कागदपत्रे उपलब्ध करावीत, असा आदेश दिला होता. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. त्या ठिकाणीही कर्नाटक सरकारने खोटेनाटे सांगून आपले अंग काढून घेतले आहे.

मराठी भाषिकांवर दडपशाही

मराठी भाषिकांवर दडपशाही करण्यासाठी कर्नाटक सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता मराठी भाषिक गप्प राहणार नाहीत, येत्या 22 तारखेपर्यंत जर परिपत्रके उपलब्ध झाली नाहीत तर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच शेतकऱयांच्या उताऱयावर नो-क्रॉप्सचा उल्लेख करण्यात आला आहे, तो काढावा. शिवजयंती मिरवणुकीवेळी डॉल्बी लावल्याच्या कारणातून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घ्यावेत. हलगा येथील शेतकऱयांची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो थांबवावा, या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. राम आपटे, प्रकाश मरगाळे, माजी आमदार दिगंबर पाटील, ऍड. नागेश सातेरी, ऍड. महेश बिर्जे, ऍड. सुधीर चव्हाण, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, मालोजी अष्टेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, आर. आय. पाटील, गणेश दड्डीकर, माजी आमदार मनोहर किणेकर, मदन बामणे, गोपाळ पाटील, राजाभाऊ पाटील, निंगाप्पा मोरे, तालुका पंचायत सदस्य वसंत सुतार, संजय पाटील, चेतक कांबळे, मोनाप्पा पाटील, ईश्वर गुरव, लता पाटील, सुनीता जाधव, जयश्री चलवादी, पुष्पा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.