|Monday, November 12, 2018
You are here: Home » Top News » धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही : जानकर

धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही : जानकर 

ऑनलाईन टीम / पंढरपूर :

मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका, धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

पंढरपूर येथील एका खासगी कार्यक्रमात जानकर बोलत होते. ते म्हणाले, मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्यात मंत्री झालो नाही. मागील लोकसभा निवडणुकीत मला धनगरांची मते मिळालेली नाहीत. त्यांनी मते दिली असती तर आज मी केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही जानकर म्हणाले.

Related posts: