|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 2021 पर्यंत इंटरनेटवर इंग्रजीला मागे टाकणार हिंदी

2021 पर्यंत इंटरनेटवर इंग्रजीला मागे टाकणार हिंदी 

गुगल तसेच केपीएमजीच्या नव्या अहवालाचा निष्कर्ष : प्रादेशिक भाषांनाही मिळणार महत्त्वाचे स्थान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 पुढील 4 वर्षांमध्ये भारतात इंटरनेटवर हिंदीचा झेंडा फडकेल. भारतीय इंटरनेट बाजारावर आधारित गुगल आणि आंतरराष्ट्रीय कंपनी केपीएमजीच्या नव्या अहवालानुसार 2012 साली देशात हिंदीमध्ये इंटरनेट वापरणाऱया लोकांची संख्या इंग्रजी वापरकर्त्यांच्या पुढे जाणार आहे.

2021 साली आजच्या तुलनेत दुप्पट संख्येत भारतीय इंटरनेटचा वापर करतील. फक्त हिंदीच नव्हे तर मराठी, बांगला, तमिळ आणि तेलगू भाषिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत देखील वृद्धी होणार आहे.

  भारतातील इंटरनेट वापरकर्ते

साल………… कोटीमध्ये

2011……….. 11.0

2016……….. 40.9

2021……….. 73.5 (अनुमानित)

भाषांचा सेवाविस्तार

भारतीय भाषांमध्ये इंटरनेट चालविणारे वापरकर्ते केवळ संभाषण आणि मनोरंजनासाठी प्रादेशिक भाषांची निवड करतात असे नाही तर डिजिटल देयक, डिजिटल वृत्त, ऑनलाईन सरकारी सेवा इत्यादी बाबी देखील याच भाषांमध्ये वापरत आहेत.

2021 मधील वापरकर्ते

हिंदी…………. 20.1 (38 टक्के)

बांगला………. 4.2 (8 टक्के)

तेलगू…………. 3.1 (6 टक्के)

तमिळ……….. 3.2 (6 टक्के)

मराठी……….. 5.1 (9 टक्के)

गुजराती……… 2.6 (5 टक्के)

कन्नड…………. 2.5 (5 टक्के)

मल्याळम……. 1.7 (5 टक्के)

इतर भाषा…… 11 (20 टक्के)

यामुळे फडकणार  झेंडा

?   मोबाईल इंटरनेट सेवांचे कमी होणारे दर. सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2016 दरम्यान मोबाईल डाटांच्या दरात 95 टक्क्यांची घट

?   देशाच्या अनेक दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचत आहे.
2021 पर्यंत भारतात इंटरनेटचा विस्तार 52 टक्के अधिक असेल.

?   पुढील 5 वर्षांमध्ये नवे 18 कोटी स्मार्टफोनधारक जोडले जातील.

?   ग्रामीण भागांमध्ये साक्षरता दर वाढत आहे. मार्च 2019 पर्यंत 6 कोटी ग्रामीण घरांना साक्षर करण्याचे सरकारचे लक्ष्य.

?   इंटरनेटवर वेगाने भारतीय भाषांमधील माहितींचे भांडार वाढत असून लोकांसाठी प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट वापरणे सोपे झाले आहे.

?   73.5 कोटी 2021 साली एकूण संभाव्य भारतीय इंटरनेट वापरकर्ते

?   53.6 कोटी जण भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणार

?   20.1 कोटी एवढे असतील हिंदी भाषेतील वापरकर्ते

?   19.9 कोटी इंग्रजी भाषेतील वापरकर्ते

?   3 टक्के दराने वाढणार इंग्रजीतील वापरकर्ते

?   18 टक्क्मयांनी भारतीय भाषांच्या वापरकर्त्यांनी संख्या दरवर्षी वाढणार

?   10 नव्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 9 जण असतील भारतीय भाषिक

Related posts: