|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नालेसफाईचे काम तात्काळ सुरू करून गतीने पूर्ण करा

नालेसफाईचे काम तात्काळ सुरू करून गतीने पूर्ण करा 

प्रतिनिधी/ सांगली

मनपा क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाई तात्काळ सुरू करून ती गतीने पूर्ण करण्याच्या सुचना शुक्रवारी अधिकाऱयांच्या बैठकीत देण्यात आल्या. पावसाळयात निर्माण होणाऱया समस्येला कर्मचारी अधिकाऱय़ांनी सतर्क राहून सज्ज राहावे अशाही सुचना देण्यात आल्या.

 डेनेजची चांगली व्यवस्था नसल्याने प्रत्येक पावसाळयात मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचुन राहते. यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. शहरातील मारूती चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, स्टेशन रोड, आदी शहराच्या मुख्य भागातील प्रमुख रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा डोहच साचत असतो, पाण्याचा निचारा लवकर होत नसल्याने हे पाणी पाऊस पडल्यानंतर तास दोन तास थांबून राहते. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, वाहतुकही खोळंबते. याशिवाय शहराच्या उपनगरामध्येही गटारीची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचुन राहते.

 डेनेजचा प्रश्न असला तरी या पाण्याच्या निचऱयासाठी आहे त्या गटारी पावसाळयापूर्वी साफ करणे महत्वाचे आहे.  नालेसफाई करूनही पाण्याचा निचरा होत नाही आणि नागिरीकांना त्रास सहन करावा लागतो. माधवनगर वरील बायपास येथून पश्चिमेकडून पूर्वेकडे भोबे गटार जाते, मोठीच्या मोठी असलेल्या या गटारतुन निम्या शहराचे पाणी जाते, या गटारीच्या सफाईचे कामही अध्याप सुरू झाले नाही.

 शहरातील शंभर फुटी रोडवरही मोठी गटार आहे ही गटार सध्या दहा बारा फुट खोल असूनही कचरा, गाळांनी अर्धी भरली आहे याचीही  सफाई केली नाही. या गटारीतील कचरा पाईमध्ये अडकून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. प्रत्येक पावसाळयात शहरातील प्रमुख मार्गावर व चौकात पाण्याचे डोहच्या डोह साचतात, हे कशामुळे पाणी साचते हे मनपाला वर्षानुवर्षे कळत नाही. सध्या मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावली असल्याने पुन्हा नालेसफाईचा विषय एwरणीवर आला आहे. या प्रश्नी शुक्रवारी अधिकाऱयांची मनपात बैठक झाली. उपायुक्त सुनिल पवार यांनी घेतलेल्या बैठकीला मनपाच्या आरोग्य विभागासह इतर संबधित विभागाचे अधिकारी, उपस्थित होते.

या बैठकीत या पावसाळयातील नालेसफाईसाठी 34 लाख 39 हजाराचे मागील ठेकेदाराला काम करण्यास मुदतवाढ दिली असून तात्काळ कामे सुरू करून पंधरवडयात पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. याशिवाय पावसाळयात वाऱय़ामुळे झाडे पडूण वाहतुक खोळंबते, याशिवाय वीज पुरवठाही खंडीत होतो अशा पार्श्वभूमिवर घटनेच्या ठिकाणी तात्काळ हजर राहून कामे मार्गी लावण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

Related posts: