|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निरोगी राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा

निरोगी राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा 

प्रतिनिधी/ फातोर्डा

निरोगी राहायचे असेल, तर प्रथम आपण आजार कसा होतो ते समजून घेतले पाहिजे. फक्त रक्ततपासणीच्या अहवालावर अवलंबून न राहता मनाची शक्ती वाढवायला हवी. रोगावर फक्त औषधे घेण्यापुरते मर्यादित न राहता तो मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी प्रथम जेवणाच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. बारा तास खावे आणि बारा तास पचण्यासाठी वेळ द्यावा. पहिले अन्न पचल्याशिवाय दुसरे मुळीच खाऊ नये. अर्धवट पचनामुळे रोग निर्माण होतात. आपण काय खातो त्यापेक्षा कसे पचवतो ते महत्त्वाचे आहे, असे उद्गार कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांनी काढले.

घोगळ हाऊसिंग बोर्डमधील घोगळेश्वर मंदिराच्या सभागृहात ‘मधुमेह हद्दपार कसा करावा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘परंपरागत आहार घ्यावा. आपल्यासाठी काय योग्य ते समजून घ्यावे. आरोग्याची सुरुवात स्वयंपाकघरातून होते. आरोग्य म्हणजे काय हे जर स्त्रीला कळले, तर पूर्ण कुटुंब आरोग्यदायी होते. आहार हे रोजचे औषध असून न पचलेल्या कफामुळे मधुमेह होतो. यामुळे गरजेपुरते व पचनापुरते पाणी प्यावे. अती पाणी हे मधुमेहाला निमंत्रण आहे. मधुमेही रुग्णांनी दूधाला शत्रू मानावे, मात्र त्यापासून बनविलेले ताक, लोणी, तूप चालेल. आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील स्थानिक फळे, भाज्या खाव्यात, असेही दामले यांनी पुढे सांगितले. यावेळी अनेकांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

Related posts: