|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावातील कत्तलखान्यात बांगला घुसखोरांना नोकरी

बेळगावातील कत्तलखान्यात बांगला घुसखोरांना नोकरी 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱया महिलेसह सात बांगला घुसखोरांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. खासकरून ऑटोनगर परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यात या घुसखोरांना कामधंदा देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून हे बांगला घुसखोर बेळगावात वास्तव्य करून आहेत, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पुणे विमानतळावर 2 मे रोजी सायंकाळी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतलेल्या महंमदअलअमीन शफीकउद्दीन बेपारी (वय 26, रा. लक्ष्मीपूर, मधीरापूरपीएस, कलकणी, ढाका-बांगलादेश) याची एनआयए व आयबीच्या अधिकाऱयांनीही चौकशी केली असून त्यानंतरच त्याला बेळगावला आणण्यात आले आहे. सध्या माळमारुती पोलिसांनी महंमदअलअमीनला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत घेतले आहे.

फरशी बसविण्याचे काम करणारा महंमदअलअमीन हा केवळ आठ दिवसांसाठी दुबईला जाणार होता. दुबईहून परतल्यानंतर कामासाठी कॅनडाला जाण्याचा त्याचा बेत होता. मात्र, दुबईला जाण्याआधीच तो इमिग्रेशन विभागाच्या ताब्यात सापडला. महंमदअलअमीनच्या पासपोर्टवर रामतीर्थनगर, बेळगावचा पत्ता होता. त्यामुळे बेळगावबद्दल माहिती असणाऱया एका अधिकाऱयाने त्याच्याशी कन्नड आणि मराठीमधून संभाषण केले. अधिकाऱयांच्या प्रश्नाला तो व्यवस्थित उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला.

बांगलादेशचे नागरिकत्व सिद्ध करणारी ओळखपत्रे

उपलब्ध माहितीनुसार इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱयांनी महंमदअलअमीनला पुणे विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची बॅग तपासली असता त्याच्याकडे बांगलादेशचे नागरिकत्व सिद्ध करणारी ओळखपत्रे सापडली. त्यानंतर तातडीने ही माहिती एनआयए व आयबीलाही देण्यात आली. दोन्ही विभागांच्या अधिकाऱयांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याला बेळगावला आणण्यात आले. बांगलादेशच्या पासपोर्टवर दुबई गाठले तर काम मिळत नाही. त्यामुळे आपण बेळगावात पासपोर्ट बनवून दुबईला जाण्याचा प्रयत्न केल्याची कबुली महंमदअलअमीनने दिली आहे.

Related posts: