|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » केजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप

केजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आमदी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला.

केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये दिल्याचे आपण स्वतः पाहिले आहे. 50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पैसे दिले असल्याचा आरोप त्यांनी केला. केजरीवाल यांच्या एका नातेवाईकसाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावाही मिश्रा यांनी केला. कपिल मिश्रा हे दिल्लीचे जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री होते. तसेच ते कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय मानले जात आहे.

Related posts: