|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » खासदार काकडेंच्या कन्येचा शाही विवाहसोहळा ; टीकेनंतर सारवासारव

खासदार काकडेंच्या कन्येचा शाही विवाहसोहळा ; टीकेनंतर सारवासारव 

ऑनलाईन टीम / पुणे :

भाजप खासदार संजय काकडेंची कन्या कोमल आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन यांचा शाही विवाहसोहळा रविवारी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला. लग्नात कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने काकडेंवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, काकडे यांनी राज्यातील गरजू मुलांना एक कोटी रूपयांची मदत करणार असल्याचे सांगत सारवासारव करून आपली बाजू मांडली.

न्यूकोपरे गावातील रहिवाशांचं पुनर्वसन झालेलं नसतानाही काकडे मुलीच्या लग्नग्नात लाखोंची उधळपट्टी करत आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक प्रकारे काकडेंनी या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. संजय काकडे यांच्या कंपनीने न्यूकोपरे गावातील नागरिकांचं पुनर्वसन रखडवलं आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतरही संजय काकडेंनी त्यांचं पुनर्वसन केलं नाही. मात्र मुलीच्या लग्नग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु असल्याने टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, यावर सारवासारव करत काकडे म्हणाले, राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत. यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे. जिल्हाधिकाऱयांकडे धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Related posts: