|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

जस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

प्रतिनिधी/ सातारा

येथील शुभ सप्तपदी वधुवर सुचक यांच्यावतीने व जस्ट युवर्स इव्हेंट प्लॅनर यांच्या सहाय्याने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा व निवडक चित्राचे प्रदर्शन उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून अनंत इंग्लिश स्कूलचे शेख, कला महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळ, चित्रकार तारू, सेवानिवृत्त पी.एस.आय. सर्जेराव कदम, फटटण येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ उपस्थित होते.

यावेळी किर्ती अडसूळ म्हणाल्या, समाजातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लहानापासून मोठयापर्यंत सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेवून आपले कलागुण सादर केले. यामुळे त्यांच्या कलेची कदर करत आम्ही त्यांना पारितोषिकांने सन्मानित केले. चित्रकला स्पर्धा तीन गटामध्ये घेण्यात आली. लहान गटामध्ये मिहीर कुंभारे याने प्रथम, श्रुती पाटीलने व्दितीय, पुर्वा जंगमने तृतीय क्रमांक, मोठा गटामध्ये अर्थव मोटेने प्रथम, अभिषेक कुलकर्णीने व्दितीय, श्रावणी मतकरने तृतीय क्रमांक तर खुल्या गटात मंगेश शेवतेने प्रथम, अपूर्वा रजपूतने व्दितीय, सोनाली पारखीने तृतीय क्रमांक मिळवला. पारितोषिक वितरण शेख, संजय धुमाळ व डॉ. चेतना माजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. ट्राफी व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते. शेख, संजय धुमाळ, मिहिर कुंभारे, मंगेश शेवते, रजपूत अपूर्वा यांनी मनोगत व्यक्त केले. सागर गायकवाड, प्रा. महेश जाधव, चाळके, टी. बी. तारु यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सौ. अस्मिता कदम यांनी सूत्रसंचालन केले.