|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माळशिरस तलाठी कार्यालयाच्या वृक्ष संगोपनाचा आदर्श इतर कार्यालयांनी घ्यावा

माळशिरस तलाठी कार्यालयाच्या वृक्ष संगोपनाचा आदर्श इतर कार्यालयांनी घ्यावा 

माळशिरस / प्रतिनिधी

……..माळशिरस तलाठी पी के उन्हाळे यांनी तलाठी कार्यालयाच्या व महसूल भवन याच्या पटांगणात विविध प्रकारची झाडे लाऊन अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचे संगोपन केले असून त्या झाडामुळे कार्यालयाला शोभा आली असून केवळ उद्धिष्ठ पूर्ती साठी झाडे लावनायाणी या कार्यालयाचा आदर्श घ्यावा अशी चर्चा प्रतिक्रिया या ठिकाणी भेट देणाया शेतकरयातून  येत आहे .राज्यामध्ये सततच्या दुष्काळावर कायम स्वरूपी योजनेसाठी राज्य शाशनाने गतवर्षी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला .तालुक्यात सुमारे 2 लाख 62 हजार वृक्ष लावण्यात आल्याचे सांगण्यात येते .या उपक्रमात प्रशासकीय यंत्रणेला हि सामावून घेण्यात आले होते .त्याचाच एक भाग म्हणून माळशिरस चे तलाठी पी के उन्हाळे यांनी तलाठी कार्यालय व महसूल भवन समोरच्या परिसरात फायकस 46,लिंब 4,वड 2,पेरू 2,जाबुळ 6,सीताफळ 5,रामफळ 5,बेल 1,गुलाब 2,पारिजातक 10,उंबर 2,रबर 2,आवळा 2,अशोक 1, व तर  तार कम्पौड च्या लगत 300 दुधोनी च्या झाडांची लागवड केली .त्यासाठी त्यांना सुमाचे  4 हजार रुपये खर्च आला .या झाडांना पाणी घालून ती जगवणेचे आव्हान त्यांचे पुढे होते .त्यांनी महसूल भवन येथे असणाया विंधन विहिरी मध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवून त्याच्या पाण्यावर हि झाडे जागवण्याचा निर्धार केला .या विंधन विहिरीवर स्वखर्चाने मोटर बसविली .मोटर चे पाणी झाडांना पाईप ने स्वत व कर्मचायाच्या मदतीने देऊ लागले .झाडांना पाणी मिळू लागल्याने झाडे चांगली डोलू लागली .पाणी घालण्यास वेळ झू लागला .वेळ व पाण्याची बचत व्हावी म्हणून त्यांनी या सर्व झाडांना ठिबक सिंचन केले त्यामुळे पाण्याची बचत व त्यांचा व कर्मचायाचा वेळ वाचला .आता ऐन उन्हाळ्यात हि झाडे हिरवीगार आहेत .या झाडामुळे या कार्यालयाला निसर्ग सौंदर्य प्राप्त झाले आहे .या ठिकाणी माळशिरस मोटेवाडी ,मेडद ,उंबरे दहीगाव , गारवड,मगरवाडी या भागातील कामासाठी सातत्याने येत असतात .या कार्यालयात शेतकयांची कायम वर्दळ असते ,येणारे शेतकरी कार्यालयाचे निसर्ग सौंदर्य पाहून समाधान व्यक्त करतात ,व तलाठी उन्हाळे यांचे तोंड भरून करतात व इतर हि प्रशासकीय कार्यालयाने या तलाठी कार्यालयाच्या  झाडे संगोपनाचा आदर्श  घ्यावा अशी चर्चा करीत असताना दिसून येतात

Related posts: