|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वळीवामुळे तालुक्मयातील दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत

वळीवामुळे तालुक्मयातील दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत 

प्रतिनिधी / बेळगाव

जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह वळिवाने रविवारी नंदिहळ्ळी परिसराला झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱयांमुळे घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच 10 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. यामुळे सुमारे 15 लाखाहून अधिक नुकसान झाले.  झाड पडून बकऱयाचाही मृत्यू झाला आहे.

रविवारी शहरात पावसाने केवळ हजेरी लावली होती. तर तालुक्मयातील दक्षिण विभागात जोरदार पाऊस झाला. दुपारी 4 च्या सुमारास जोरदार वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, के. के. कोप्प, अंकलगी, गुंजी आदी भागाला जोरदार पावसाने तासभर झोडपले आहे.

काही काळ वाहतूक ठप्प

जोरदार वाऱयामुळे नंदिहळ्ळी गावातील तसेच इतर परिसरातील घरांवरील छपरे व पत्रे उडून गेले आहेत. या घरात राहिलेल्या नागरिकांचा संसारच उघडय़ावर आला. सुदैवानेच या घटनेत कोणी जखमी झाले नाही. तर मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. नागरिकांनी झाड बाजूला करून ये-जा करण्यास वाट करुन दिली. याचबरोबर शिवारांतही मोठय़ा प्रमाणात झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत.

 हा पाऊस मशागतीसाठी फायदेशीर ठरला आहे. शेतकरी सुखावले असले तरी अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान नंदिहळ्ळी गावातच 10 हून अधिक घरांची पडझड झाली असून सुमारे 15 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्या कुटुंबीयांची माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकर व ग्राम पंचायत सदस्यांनी चौकशी केली असून मदत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. 

शेणखत टाकण्यासाठी शिवाराकडे गेलेले ट्रक्टरही शिवारातच अडकले आहेत. यामुळे शेतकऱयांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. आता चार दिवसात मशागतीचे कामे उरकण्याच्या घाईगडबडीत शेतकरी दिसणार आहेत.

अनेक खांब कोसळले

शुक्रवारी बसवनकोळ्ळ येथे 33 केव्ही क्षमतेचा विद्युत टॉवर जोरदार वारा आणि  पावसामुळे कोसळला होता. सध्या नंदिहळ्ळी परिसरातील विविध भागात जोरदार वाऱयामुळे अनेक खांब कोसळले आहेत. हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी तातडीने विद्युत पुरवठा बंद केल्याने अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.

झाड कोसळून बकऱयाचा मृत्यू

नंदिहळ्ळी येथे जोरदार वाऱयासह पावसाने आगमन झाले. त्यावेळी एका बकरीवर झाड कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित मालकाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Related posts: