|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा : दानवे

शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा : दानवे 

ऑनलाईन टीम / शिर्डी :

शेतकऱयांना कर्जमाफी केल्यानंतर आत्महत्या थांबणार असतील. तर विरोधकांनी एकत्र यावे आणि शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

शिर्डी येथे साईंच्या दर्शनाला आले असता दानवे बोलत होते. ते म्हणाले, कर्ज माफ करुन शेतकऱयांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, राजकीय जोडे बाहेर काढावे. तसेच राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल. आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचे लक्ष पायाभूत सुविधांवर आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: