|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » छापा टाकण्यापूर्वीच दोन कोटी केले गायब !

छापा टाकण्यापूर्वीच दोन कोटी केले गायब ! 

 

प्रतिनिधी/ सांगली

मिरज येथील बेथेलहेमनगर येथे छापा टाकण्यापूर्वीच आरोपी मुल्लांकडे सुमारे पाच कोटी इतकी रक्कम होती मात्र यातील दोन कोटी रूपयेच्या दोन बॅगा एका चारचाकी गाडीतून गायब केल्याची चर्चा आहे. या बॅगा नेणारे पोलीस सध्या नामेनिराळे झाले आहेत. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येवू लागल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

 एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरिक्षक विश्वनाथ घनवट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि 12 मार्च 2016 मध्ये मिरजेतील बेथेलहेमनगर छापा टाकून मोहिद्दीन मुल्ला याच्या घरातून तीन कोटी सात लाखाची रोकड जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करताना एलसीबीच्या टोळीने वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील दोन वेळा घरफोडी करून नऊ कोटी 18 लाखांवर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी पोलीस निरिक्षक विश्वनाथ घनवट,सहाय्यक निरिक्षक सुरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, दीपक पाटील, शंकर पाटील, पोलीस नाईक कुलदीप कांबळे, रव्रिंद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्हयामुळे सध्या हे सर्व पोलीस पसार झाले असून त्यांनी अटपूर्वसाठी न्यायालयात धाव घेतली पण न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची शक्य़ता आहे. दरम्य़ान कोटयवधी रूपयांच्या चोरीप्ररणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. ज्या वेळी एलसीबीच्या पोलीसांनी कोटयवधी रूपये चोरी प्रकरणातील मुख्य सुत्रधार मोहिद्दीन मुल्ला याच्या मिरजेतील बेथेलहेमनगर येथील घरावर छापा टाकला त्यावेळी मुल्ला याच्या घरामध्ये एक कोटीच्या पाच बॅगा होत्या.

मुल्ला याने घरात कोटयवधी रूपये ठेवल्य़ाची माहिती ज्या पोलीसांना प्रथम मिळाली त्यातील पोलांनी यातील दोन बॅगा एका खासगी चारचाकीतून गायब केल्या. त्यानंतर काही वेळाने एलसीबीच्या पोलीसांनी मुल्ला याच्या घरावर छापा टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यांनी दोन कोटी रूयये असलेल्या बॅगा गायब केल्या त्या पोलीसांची नावे या प्रकरणात अध्याप आलेली नाहीत. यातील काही जण सध्या बदलीने दुसऱया पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या ते नामेरिनाळेच आहेत. ज्यांचा या प्रकरणात आर्थीक काहीही संबध नाही असेही सध्या चौकशीच्या फेऱयात अडकले आहेत मात्र चोरावर मोर होणारे मोकळेच फिरत आहेत. यांच्या पर्यंत ही चौकशी पोहोचणार का असा सवाल केला जात आहे.

घनवटसह चोरीतील आरोपी सांगलीतच

दरम्यान वारणानगर येथील नऊ कोटींवर घरफोडी प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आणि सध्या फरार असलेले एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरिक्षक विश्वनाथ घनवटसह इतर पोलीस सांगलीमध्येच फिरताना दिसत आहेत. न्यायालयाने जामिन फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची शक्य़ता आहे. या अधिकारी आणि पोलीसांची त्यांचे सवंगडी भेट घेवून अपूलकीने विचारपूस करीत असल्याची चर्चा आहे. ज्यांनी पदावर असताना साथ दिली, मदत केली, सहकार्य केले त्यांनाच अडचणीच्या वेळी विसरायचे कसे या भावनेतून त्यांची भेट घेत आहेत.

Related posts: