|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » एडीबीने प्रक्रिया सुधारावी : जेटली

एडीबीने प्रक्रिया सुधारावी : जेटली 

वृत्तसंस्था/ योकाहामा

आशियाई विकास बँकेने (एडीबी) कर्ज मंजूर करण्यासाठी आणि ते देण्याची प्रक्रिया कमी करण्याची आवश्यकता आहे, असे भारताने म्हटले आहे. आशियातील विकसनशील देशांनी आपल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रातील खर्च वाढविण्यासाठी तत्काळ निधीची आवश्यकता आहे. बँकेच्या दक्षिण आशियाई भागासाठी नवीन दिल्लीमध्ये एक रिजनल हब बनविण्यात यावे, त्यामुळे अधिकांश प्रस्तावांची प्रक्रिया तेजीने होईल असे अरुण जेटली यांनी म्हटले.

बँकेने वेळेच्या मागणीनुसार आपली प्रकिया आणि कामकाज सुधारण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या पाहता यामध्ये अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कर्ज मंजुरी आणि निधी देण्याच्या वेळेमध्ये कपात करण्याची आवश्यकता आहे. यासाठी एक प्रस्ताव संमत करण्याची आवश्यकता आहे. अन्य सदस्य या प्रस्तावाला संमती देतील असे जेटली यांनी म्हटले.

एडीबीला लवकरच 50 वर्षे पूर्ण होतील. यावेळी बँकेसमोर असणाऱया अन्य पर्यायांचा विचार करता येईल आणि भविष्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करता येईल. आशिया आणि प्रशांत भागातील गरिबी हटविणे हे बँकेचे प्रमुख लक्ष्य आहे. ऊर्जा, ग्रामीण विकास आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांव्यतिरिक्त पूनर्वापर करता येणाऱया ऊर्जेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील आव्हानांचा विचार करत रणनिती तयार करावी असे जेटली यांनी म्हटले.

सर्व विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. या कृषी क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, माल वितरण प्रणाली, माल विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त बँकेने आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सामाजिक सेवांवर लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.