|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बोगस कंपनीद्वारे साडेसहा कोटींची फसवणूक

बोगस कंपनीद्वारे साडेसहा कोटींची फसवणूक 

प्रतिनिधी / सातारा

येथील विकासनगर, वनवासवाडी, संगमनगर व कृष्णानगर येथील लोकांना सुरवातीला तुळशीच्या रोपांचा व्यवसाय करून लोकांना त्यात तीन महिन्यात फायदा मिळवून देवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलेले डॉ. निरंजन जाधव व डॉ. गणेश माने दोघे ही रा.पुणे यांनी नंतर  aस्gs.म्द.ग्ह या नावाची बोगस कंपनी हडपसर पुणे येथे सुरू करून साताऱयातील जवळपास 151 लोकांची साडे सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे प्रत्यक्षात ही रक्कम आणखी जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.हा प्रकार हडपसर पुणे येथे घडल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2015 पासून डॉ. निरंजन जाधव व डॉ. गणेश माने यांनी येथील विकासनगर, वनवासवाडी, संगमनगर व कृष्णानगर येथील लोकांना प्रथम दहा कुंडय़ा, माती व तुळशीची बी देवून त्यांच्या कडून 1 हजार रुपये घेत होते. तीन महिन्याचे तुळशीचे रोप तयार झाल्यावर संबधित व्यक्तिकडून घेतलेले पैसे त्यांना परत करून त्यांनी वाढवलेली रोपे घेवून जात होते. व पुन्हा तीन-तीन महिन्यांनी वाढवलेली रोपे घेवून त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तिला 100 रुपये प्रमाणे पैसे देत आशा प्रकारे त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डॉ. निरंजन जाधव व डॉ. गणेश माने यांनी त्यांच्या व्हॉट्सअप अकाऊंटवरुन हडपसर पुणे येथे जून 2016 पासून वेबसाईट सुरू करून जीन्स पॅंन्ट, लेगइन, साडय़ा, भांडी, झुंबर, फर्निचर, भाज्या व इतर साहित्य खरेदी विक्रीचे डील सुरू केले आहे. असे मेसेज पाठवू लागले त्यांनी दहा हजार रुपये त्यांच्या ऍक्सीस बँक हडपसर पुणे येथे जमा केल्यास त्यांना तीन महिन्यामध्ये साहित्य खरेदी न करता 20 हजार रुपये मिळतील असे मेसेज येवू लागले. जादा रक्कम गुंतवल्यास जादा आर्थिक फायदा होणार असल्याचे ते सांगत. तसेच त्याचे ऑनलाइन बुकिंग ही सुरू केले. त्यामुळे सातारा येथील तुळशीचे उत्पन्न घेणारे लोक तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र यांचा या दोघांवर विश्वास बसल्याने सातारा शहर व उपनगरातील अनेक लोकांनी 10 हजारापासून ते 5 लाखापर्यंत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

या रकमा अक्सिस बँक हडपसर शाखा पुणे येथे डॉ. जाधव यांच्या अकाऊंटवर वेळोवेळी भरले परंतु त्यांनी गुंतवणूक दारांची रक्कम अथवा त्याचे व्याज परत दिले नाही. खातेदारांनी दोन्ही कंपनीची हडपसर पुणे येथे जाऊन माहिती घेतली असता सादर कंपनी बोगस असल्याचे व गुंतवणूक दारांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

त्यामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी सातारा पोलीस ठाण्यात येवून डॉ. निरंजन वेताळ जाधव व डॉ. गणेश रघुनाथ माने दोघे (रा. पुणे) यांच्या विरुद्ध तक्रार देवून गुन्हा दाखल केला. मात्र हा प्रकार हडपसर पुणे येथे घडल्याने हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Related posts: