|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आमदारांची संख्या 18 वर नेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

आमदारांची संख्या 18 वर नेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न 

प्रतिनिधी/ पणजी

काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी चेल्लाकुमार यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध गटाध्यक्षांशी चर्चा केली. अनेक आमदारांनादेखील त्यांनी चर्चेसाठी बोलाविले होते. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालू होती. गोव्यात होणाऱया दोन पोटनिवडणुकींसाठी रणनीती आखून त्या कशा जिंकायच्या यावर त्यांनी चर्चेचा भर दिला होता. सध्या 16 असलेल्या आमदारांची संख्या 18 वर नेण्यासाठी सर्व काँग्रेसजणांना व आमदारांना एकत्र आणण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.

गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम त्यांनी चालविले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे या दोघांच्या विरोधात प्रबळ उमेदवार पोटनिवडणुकीत उभा करण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधात जनमत कौल असताना भाजपनेच सत्ता हिसकावली हे जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा इरादा असून त्यातून जनतेचा पाठिंबा मिळवायचा आणि मतदानातून भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकाऱयांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

Related posts: