|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » स्वाईन फ्ल्यूच्या लक्षणांमध्ये डायरिया नवीन लक्षण

स्वाईन फ्ल्यूच्या लक्षणांमध्ये डायरिया नवीन लक्षण 

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुषित पाणी आणि बर्फाचा धसका घेतला असून बर्फ व्यापाऱयांवर धाडसत्र सुरू केले आहे. मात्र, दरम्यान पावसाळा-हिवाळ्यात सर्रास आढळणारे स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आता ऐन उन्हाळ्यातही दिसू लागली आहेत. यात घसा खवखवणे, अंगदुखी सारख्या पारंपरिक लक्षणांमध्ये डायरियाचे नवे लक्षणही दिसू लागत असल्याचे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

पालिकेच्या नेमक्याच प्रभागांमध्ये अतिसाराचे अतिप्रमाण झाले असले तरी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सडकून कामाला लागले आहे. अतिसाराचा मागोवा घेत असताना साथीच्या आजारांमध्ये आता स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण तपासात येत आहेत. त्यात दिड महिन्याच्या बालकाच्या मृत्यूने स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आरोग्य विभागाच्या चाळणीखाली आहेत. रुग्णांच्या तपासणी आणि चाचण्यांमधून लक्षणांची विभागवारी होत आहे. आतापर्यंत घसा खवखवणे, अंगदुखी, ताप या लक्षणांसोबत डायरीया हे लक्षण स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये नव्याने आढळून येत असल्याचे सांगण्यात आले. नवे वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे एकूण 21 रुग्ण आढळले. यामुळे मुंबईतील वाढत्या साथीच्या आजारांविषयी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करावे, असेही सांगितले आहे.

बर्फावर अजिबात विश्वास नको

तारांकित हॉटेल असोत वा टपऱयांवरील पाणी पिताना काळजी घ्यावी. कोणत्याही हॉटेलमध्ये बर्फ किंवा बर्फाचे पाणी दिल्यास पिऊच नका. बाहेरील बर्फ टाळवा, असे आवाहन डॉ. केसकर यांनी केले. मुंबईत अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईमध्ये 74 टक्के बर्फाचे नमुने योग्य नसल्याचे चाचणीमधून उघड झाले आहे. हॉटेलमधील 0.4 टक्के तर फेरीवाल्यांकडील 10 टक्के पाणी दूषित असल्याचे चाचणीमधून समोर आले आहे.

 

 

 

 

Related posts: